Saturday, May 26, 2012

अभिनयातून बोलताना


सस्नेह नमस्कार, 
आज बऱ्याच दिवसांनी blog  लिहितेय.

     गेल्या आठवड्यात 'अजिंठा' आणि आज  'काकस्पर्श' असे नुकतेच प्रदर्शित झालेले दोन्ही चित्रपट पहिले.अर्थात दोन्ही चित्रपट वेगवेगळे आहेत  पण आजच्या समाजाला धरून मला त्यात  का 'काहीतरी' वाटले....तेच ह्या लेखात मांडण्याचा प्रयत्न करत आहे.
   'अजिंठा'मधील सोनाली आणि 'काकस्पर्श'मधील प्रिया बापटचा अभिनय खरेच वाखाणण्याजोगा आहे. सोनाली  'पारो'ची  भाषा भिन्न असूनही आपल्या प्रियकरावर असलेले निरासक्त प्रेम, त्याच्याबद्दल अमाप आदर बाळगणारी आणि दुसर्या बाजूला  भाषा एक  असूनही अकाली 'वैध्यत्व' नशिबाला आल्याने मनाचा न संपणारा कोंडमारा आणि घुसमट ह्यात होरपळलेली 'उमा'.पारो आणि उमा दोघींचाही शेवट 'तिखट.' माणूस म्हणून आवश्यक असणाऱ्या  गरजांसाठी चाललेली धडपड पण समाजाच्या रूढी, धर्मांच्या बंधणांनी जखडकल्याने ह्या गोष्टींचीही तिलांजली द्यावी लागली.
    दोन्ही चित्रपट बघताना मध्यान्ताराच्या वेळी, आपण  विसाव्या शतकातील स्त्रिया किती lucky आहोत त्यामाने ह्याची कुठेतरी जाणीव झाली. मान्य आहे कि आजही बर्याच स्त्रियांना म्हणावे तितके स्वातंत्र्य नाही पण साधारण गतकाळाचा विचार करता मलातरी वाटते कि आपण फार नशीबवान नक्कीच आहोत. निदान आजच्या काळात आपले म्हणणे ऐकून घेणारे, त्यांचा विचार करणारे व (अंशत:) आदर करणारी मंडळीही बर्यापैकी उपलब्ध आहेत. 
बर्याच वेळी आपण नसलेल्या गोष्टींचे दु:ख जास्तवेळ 'साजरे' करतो सुखापेक्षा. मग सुखाचेच सोहळे करावेत असे माझे म्हणणे नाही पण न मिळालेल्या गोष्टींचीच सारखी 'पूजा' घालायला नकोत.
   बर्याच अंशी उमा आणि पारोचे प्रश्न हे आजच्या प्रश्नांशी सुसंगत असले तरी काळाच्या फरकामुळे ते आजच्या काळात सोडवता येण्यासारखे आहेत. दोन्ही व्यक्तिरेखा अभिनयातून बोलताना आपल्याला बरेच काहीतरी शिकवून जातात. आपण त्यांच्याहून किती सुखात जगत आहोत ह्याची अनेक दृश्यातून प्रचीती येते.
   मला प्रवास करायला फार आवडते, अगदी फार नाही पण जेवढा प्रवास करायला मिळतो त्यातून भेटणार्या स्त्रिया  , त्यांच्या आपापसांतील बोलणी ह्यातून बर्याचदा वाटते कि आपण अगदी छोट्या छोट्या गोष्टींचा फार बाऊ करतो. बर्याचदा प्रश्न गंभीरही असतो नाही असे नाही पण शक्यतो त्या रबरासारख्या खेचून मोठ्या केलेल्या असतात.

आपल्या मिश्र प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत!