जुना गडी नवं राज्य
'भारतमाता कि जय','इन्क़लब जिंदाबाद','अण्णा हजारे जिंदाबाद' ५ एप्रिलपासून अण्णा हजारेंचे दिल्लीमध्ये 'जंतरमंतर' येथे सुरु झालेल्या भ्रष्टाचाराविरोधातील उपोषणात लोकांच्या अशा घोषणा आकाशात दुमदुमल्या. २ एप्रिलला भारताने २८वर्षांनी क्रिकेट विश्वचषक मिळवल्यानंतर रात्री उशिरापर्यंत लोकांनी जल्लोष साजरा केला. तीच लोकं ५ एप्रिलनंतर भ्रष्टाचाराविरोधात निर्माण केलेल्या 'जन लोकपाल विधेयका'च्या संमतीसाठी मोठ्या संखेने रस्त्यावर उतरलीत.
मुख्यत्वे या विधेयकाच्या संमतीसाठी वृधांबरोबर तरुणांचा पाठींबा अधिक आढळला. त्यामुळेच इतरवेळेला आजच्या पिढीला नावं ठेवणारी मंडळी यावेळी मात्र मुग गिळून बसलीत. बीड,अकोला,जम्मू-काश्मीर,नवी दिल्ली,पुणे,मुंबई, इतर अनेक भागांतून अण्णा हजारेना प्रतिसाद लाभला.,FACEBOOK ,TWITTER सारख्या WEBSITES वरही अण्णा चमकले. अनेकांना ते आपलेसे वाटू लागले.

जन लोकपाल विधेयकाला मान्यता मिळवून देण्यासाठी स्वातंत्र्यानंतर प्रथमच लोकं इतक्या प्रचंड संख्येने एकत्र आली. इतकी वर्ष भ्रष्टाचाराच्या काळोखात गुदमरलेली माणसे श्वास घेण्यासाठी एकजूट झालीत.
पण ९ एप्रिलनंतर प्रश्न असा पडतो कि फक्त भ्रष्टाचार हा एकच असा मुद्दा आहे का जिथे लोकांनी इतकं हळवे व्हावं. त्याहूनही असेच अनेक गंभीर मुद्दे आहेत जिथे लोकांच्या एकजुटीची नितांत गरज आहे. दरवेळेस कोणी वाली येऊन आपले तारण करेल ही मानसिकवृत्ती बदलायला हवी. लोकांनी स्वतःबरोबर इतरांच्या हिताचा विचार करायला हवा. तसेच दुसरी गोष्ट म्हणजे आज लोकांमध्ये संचारलेली ही एकजुटीची भावना चिरकाल राहायला हवी. निर्माण झालेली ही ज्योत सतत तेवत ठेवायला हवी.
एखादी नवीन गोष्ट समोर येत असल्यास तिचा संपूर्ण अभ्यास करून, तिच्या फायद्या आणि तोट्यांचा विचार करून तिला पाठींबा द्यायला हवा. साहजिकच सर्व प्रश्न चटकन सुटणारे नाहीत पण त्यासाठी काम करणाऱ्या हातांची संख्या दुणावेल.
५ ते ९ एप्रिलदरम्यान आढळलेला लोकांचा प्रतिसाद नव्या चांगल्या गोष्टींची नांदी असू शकेल. जेव्हा आपण व्यक्तिगत नवीन सर्वाना हितकारक गोष्टींचा विचार करू तेव्हाच खऱ्या अर्थाने 'इन्क़लब जिंदाबाद' होईल.