Monday, May 30, 2011

छावणी

युवा श्रम संस्कार छावणीची  योजना आखली
मग १ ते ८ मे  अशी तारीख पक्की झाली

'पुस्तक' आला जळगावहून 'साळी'ने केला पुढचा परिचय
'चाम्प' सतत आळशीपणात  तर 'मानवतावादी' गहन चिंतनात

'मराठी','धरणी','स्टेथोस्कोप','प्रेत','लाट' यांची चांगली गट्टी झाली
मग 'sk ', 'सेहवाग',' रायडर','सायना' हेही त्यांना सहभागी झाले

'मितवा', 'कान','माणूस','पक्षी','गाण' गाण्यासाठी नियोजनात पुढे
मग 'दिवाने' हि त्यात दिवाने झाले

'कार','३ग़' ,'sporty ','चित्ता','भारतीय','कमळ' लवकर परत निघून गेले,
त्यातला '3G ' आणि 'भारतीय' परत आलाय.

'ग्लोबल वार्मिंग' विनोद करत तर 'fish ' ,'always ' शांत.
आणि 'रोमिओ' झोपेतही dhinchyakdhichyak  करत

'facebook 'चे हि जमले 'भूता 'शी  मित्रत्व
तर 'सूक्ष्मजीव' वेगळ्याच धुंदीत

'मांजर', 'माउस','कुत्रा' एकमेकांच्या पाठी
'dancer '  hiphop attitude  मध्ये  तर 'पेन्सील' गाण्यात मग्न

'diamond ' ,'star '  चमकण्याची आशा बाळगत
तर 'dream', 'मिठू 'जळगावच्या रंगात.

'विशू' chitchat  box  आणि 'मित्र' रत्नागिरीच्या विकासात
व शेवटी राहिलेला 'उपरा' त्याच्याबद्दल ....काय बोलू....


Saturday, May 28, 2011

झंझावत

त्या एका झंझावताने सारच मिटलं
तीच कुंकू,अस्तित्व आणि ती स्वतःसुद्धा.
कुणाच्याही अध्यातमध्यात नसलेली ती
आता एकलीच झाली आयुष्यभरासाठी...

अवघ्या  तरुण वयात 'वैधव्य'चा चटका सोसला
चक्क डोळ्यांसमोर सर्व विद्रूप झाल.
सुहासिनीचा शृंगार करून नकळतच
अंगावरविधवेच वस्त्र  चढवाव लागल.

तिची निरागसता स्वतःसाठीच आयुष्यभरासाठी जोखीम झाली
नैराश्यतेच वादळ आता रोज तिचा पिच्छा पुरवतंय.
त्या अपघातात तिचा 'तो' हि गेला
आणि तिचं तिचं..... स्त्रीत्वसुद्धा.