Saturday, May 28, 2011

झंझावत

त्या एका झंझावताने सारच मिटलं
तीच कुंकू,अस्तित्व आणि ती स्वतःसुद्धा.
कुणाच्याही अध्यातमध्यात नसलेली ती
आता एकलीच झाली आयुष्यभरासाठी...

अवघ्या  तरुण वयात 'वैधव्य'चा चटका सोसला
चक्क डोळ्यांसमोर सर्व विद्रूप झाल.
सुहासिनीचा शृंगार करून नकळतच
अंगावरविधवेच वस्त्र  चढवाव लागल.

तिची निरागसता स्वतःसाठीच आयुष्यभरासाठी जोखीम झाली
नैराश्यतेच वादळ आता रोज तिचा पिच्छा पुरवतंय.
त्या अपघातात तिचा 'तो' हि गेला
आणि तिचं तिचं..... स्त्रीत्वसुद्धा.

No comments:

Post a Comment